| दहा अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन |
• दहा अंकी संख्यांचे वाचन व लेखन :
5753152689
ही दहा अंकी संख्या पाच अब्ज पंचाहत्तर कोटी
एकतीस लक्ष बावन्न हजार सहाशे एकोणनव्वद' अशी वाचतात.
म्हणजे दहा अंकी संख्येचे वाचन करताना
दशकोटी व कोटी; दशलक्ष व लक्ष; दशहजार व हजार या स्थानांवरील अंक एकत्र वाचतात.
• संख्यावाचन सुलभ व अचूक व्हावे यासाठी स्वल्पविराम घालून अंकांचे गट पाडतात.
• स्वल्पविराम देताना प्रथम उजवीकडून डावीकडे पहिले तीन अंक (म्हणजे शतक स्थानापर्यंतचे अक)
मानडून स्वल्पविराम देतात. त्यानंतर दोन-दोनच्या गटानंतर स्वल्पविराम देतात.
उदा.
15,14,13,12,123
1 एकक
10 दशक
100 शतक
1000 हजार
10000 दशहर
100000 लक्ष
1000000 दशलक्ष
10000000 कोटी
100000000 दस कोटी
1000000000 अब्ज
10000000000 दस अब्ज
10 एकक = 1 दशक
10 दशक = 1 शतक
10 शतक = 1 हजार
10 हजार = 1 दशहजार
10 दशहजार = 1 लक्ष
10 लक्ष = 1 दशलक्ष
10 दशलक्ष = 1 कोटी
10 कोटी = 1 दशकोटी
10 दशकोटी = 1 अब्ज
1]. ‘पंधरा कोटी पंधराशे पंधरा' ही संख्या अंकांत कशी लिहाल ?
(1) 1500015
(2) 15151015
(3) 150001515
(4) 1500150015
दसकोटी कोटी दसलक्ष लक्ष दसहजार हजार शतक द ए
1 5. 0. 0. 0. 1 5 1. 5
म्हणून पर्याय 3 हे बरोबर उत्तर आहे.
2] 1357810 ही संख्या अक्षरांत कशी लिहावी ?
(1) तेरा सत्तावन्न आठशे दहा
(2) एक तीनशे सत्तावन्न आठ दहा
(3) तेरा लक्ष पाचशे अठ्ठ्याहत्तर
(4) तेरा लक्ष सत्तावन्न हजार आठशे दहा.
ही संख्या लिहितांना खालीलप्रमाणे मांडणी करावी.
दसकोटी कोटी दसलक्ष लक्ष दसहजार हजार शतक द ए
1 3. 5. 7. 8. 1 0
अशी मांडणी करून वाचन केल्यास पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे.
3. एका संख्येत 5दल, 0 लक्ष, 0 दह, 1ह, 5 श, 3 द व 7 ए आहेत; तर ती संख्या कोणती ?
(1) 5001537 (2) 50001537 (3) 501537 (4) 5100537
दसलक्ष लक्ष दसहजार हजार शतक दशक एकक
5. 0. 0. 1. 5. 3. 7
वरीप्रमाणे मांडणी केल्यास आपल्याला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर मिळते
वरील घटकावर खाली एक चाचणी दिलेली आहे.
.