मापन / महत्त्वमापन Units of measurement |
मापन / महत्त्वमापन
•लांबी•
(1) लांबी (अंतर) मोजण्याचे मीटर हे प्रमाणित एकक आहे.
(2) 1 किलोमीटर = 1000 मीटर (मी)
1मी = 100 सेंटिमीटर (सेमी)
1 सेमी = 10 मिलिमीटर (मिमी)
(3) पाव किमी =¼ किमी =0.25 किमी = 250 मी
अर्धा किमी=½= 0.5. किमी = 500 मी
पाऊण किमी =4 /3 किमी = 0.75 किमी = 750 मी.
(4) जेवढे हजार मीटर तेवढे किलोमीटर असतात आणि जेवढे किलोमीटर तेवढे हजार मीटर असतात.
(5) लांबीच्या एककांवर बेरीज-वजाबाकी यांसारख्या क्रिया करताना वरील सूत्रे उपयुक्त ठरतात.
• वस्तुमान•
(1) किलोग्रॅम हे वस्तुमानाचे प्रमाणित एकक आहे.
(2). 1 किलोग्रॅम= 1000 ग्रॅम
1 ग्रॅम = 1000 मिलिग्रॅम
1 क्विटल = 100 किलोग्रॅम
पाव किलोग्रॅम किलोग्रॅम = 0.25 किलोग्रॅम = 250 ग्रॅम
अर्धा किलोग्रॅम = ½ किग्र.=0.500 किलोग्रॅम = 500 ग्रॅम
पाऊण किलो ग्रॅम =¾ किलोग्रॅम= 0.750 किलोग्रॅम =750 ग्रॅम
(4) जेवढे हजार ग्रॅम तेवढे किलोग्रॅम आणि जेवढे किलोग्रॅम तेवढे हजार ग्रॅम.
•धारकता•
(1) लीटर हे धारकता मोजण्याचे प्रमाणित एकक आहे.
(2) 1 लीटर = 1000 मिलिलीटर
1000 मिली = 1 ली.
(3) जेवढे लीटर तेवढे हजार मिलिलीटर आणि जेवढे हजार मिलिलीटर तेवढे लीटर असतात.
(4) पाव लीटर= 0.250 ली = 250 मिली.
अर्धा ली = 0.500 ली = 500 मिली.
पाऊण ली. 3 ली = 0.750 ली = 750 मिली.
स्वाध्याय
कागदमापन - रीम, दस्ता
12 वस्तू 1डझन
12 डझन = 1 ग्रोस = 144 कागद
24 कागद = 1 दस्ता (2 डझन कागद = 1 दस्ता)
20 दस्ते = 1 रीम = 480 कागद
स्वाध्याय
1]8 डझन कागद = किती दस्ते ?
(1) 6
(2) 4
(3) 8
(4) 3.
स्पष्टीकरण :
2 डझन = दस्ता[ 24 कागद]
म्हणून 6 डझन =8/2=4 दस्ता
पर्याय (2) हे अचूक उत्तर आहे.
2.]2 रीम कागदापैकी 444 कागद वापरले, तर किती डझन कागद उरले ?
(1) 34
(2) 43
(3) 33
(4) 44.
स्पष्टीकरण :
1 रीम = 480 कागद. 2 रिम =2×480=960
त्यांपैकी 444 कागद वापरले.
उरलेले कागद = 960 – 444 =51 6
516 ÷ 12 = 43डझन. ..
पर्याय (2) हे अचूक उत्तर आहे.
3.]5डझन रंगीत कागद व 5 दस्ते पांढरे कागद मिळून किती कागद होतील?
(1) 480
(2) 180
(3) 120
(4) 256.
स्पष्टीकरण : 5 डझन = 5 × 12 = 60 कागद.
5 दस्ते = 5 x 24 = 120 कागद.
.. एकूण कागद = 60 + 120 = 180
. पर्याय (2) हे अचूक उत्तर आहे.
4]288 कागद म्हणजे किती ग्रोस कागद ?
(1) 2
(2) 3
(3) 4
(4) 1.
स्पष्टीकरण:
1 गोस = 12 डझन =144 कागद
2 ग्रोस =24 डझन= 288 कागद
म्हणून पर्याय 1 बरोबर
5] प्रत्येक वर्गाच्या हस्तलिखितासाठी शाळेने 2 ग्रोस रंगीत कागद व 6 ग्रोस पांढरे कागद मागवले. जर 24 वर्गांपैकी प्रत्येक वर्गाला समान संख्येने कागद वाटले, तर प्रत्येक वर्गाला किती कागद मिळतील ?
(1) 36
(2) 48
(3) 60
(4) 72.
स्पष्टीकरण:
2 ग्रोस = 2×144= 288 रंगीत कागद
6 ग्रोस = 6×144= 864 पांढरे कागद
एकूण कागद. =.1152
हे कागद 24 वर्गाना वाटले तर 1152÷24=48
म्हणून पर्याय 2 बरोबर.