नफा - तोटा

 

नफा - तोटा
नफा - तोटा

                                    फा - तोटा.

खरेदी किंमत[ख. कि.]

                 माल ज्या किमतीला घेतात. त्या किमतीला खरेदी किंवा खरेदीची किंमत असे म्हणतात.


विक्री किंमत [ वि. कि.] 

               माल ज्या किमतीला विकतात, त्या किमतीला विक्री किंवा विक्रीची किंमत असे म्हणतात.


नफा:

        खरेदीपेक्षा विक्री जास्त असल्यास नफा होतो.


 तोटा:

        खरेदीपेक्षा विक्री कमी झाल्यास तोटा होतो.


खरेदीच्या किमतीत केवळ खरेदीच्या किमतीचा विचार करून चालत नाही, तर माल विक्रीला ठेवण्यापूर्वी त्यावर केलेले इतर खर्च उदा., वाहतूक खर्च, हमाली, कर, दुरुस्तीसाठी केलेला खर्च यांचाही विचार करावा लागतो.


एकूण खरेदी = मूळ खरेदी + इतर खर्च.


नफा  सूत्र : 

नफा = विक्री - खरेदी


खरेदी किंमत सूत्र


ख. कि. = विक्री – नफा


ख. किं.= विक्री + तोटा


शेकडा नफा= नफा×100 ÷ ख. किं.


 तोटा सूत्र

             तोटा = खरेदी-विक्री



विक्री = खरेदी किंमत+ नफा


विक्री = खरेदी किंमत - तोटा




नमुना प्रश्न

1. 5000 रूपयांस खरेदी केलेल्या वस्तू 5678 रूपयांस विकल्या, तर या व्यवहारात किती नफा अथवा तोटा

होईल ?

(1) ₹ 678 तोटा होईल 

(2) ₹678 नफा होईल 

(3) ₹ 1678 नफा होईल 

(4) ₹ 1000तोटा होईल.

 स्पष्टीकरण : 

येथे विक्रीची किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे. म्हणून, या व्यवहारात नफा होईल.

नफा = विक्री – खरेदी = ₹5678– ₹5000 = ₹678. . पर्याय (2) हे अचूक उत्तर आहे.


2.] सलीमने ₹ 30 प्रति डझन या दराने 3 डझन पेन्सिली खरेदी केल्या व त्या प्रत्येकी ₹ 3 प्रमाणे विकल्या, तर या व्यवहारात त्याला किती नफा झाला?

(1) ₹18 

(2) ₹ 36 

(3) ₹ 30 

(4) ₹ 45.

 स्पष्टीकरण :

 खरेदी किंमत = ₹30 × 3 = ₹90

( 1 डझन= 12 पेन्सिली 

 3 डझन पेन्सिल्स = 12×3 = 36.

विक्री किंमत = 36 × 3 = ₹108 

नफा = ₹108 - ₹90 = ₹18

 पर्याय (1) हे अचूक उत्तर आहे.


3] एका दुकानदाराने एकाच पुस्तकाच्या 100 प्रति 200 रुपयांस विकल्या,तेव्हा त्याला ₹80 नफा झाला; तर प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत किती ?

(2)₹12

(2) ₹1.2

(3) ₹ 120

(4) ₹ 20


स्पष्टीकरण :

 100 पुस्तकांची खरेदी किंमत = विक्री किंमत – नफा = ₹200– ₹ 80 = ₹ 120

प्रत्येक पुस्तकाची खरेदी किंमत 120 ÷100= 1.2

 पर्याय (2) हे अचूक उत्तर आहे.


4]. एका वस्तूची विक्री किंमत ₹540 आहे. जर नफा ₹90 असेल, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?

(1) ₹ 630

(2) ₹ 450

(3) ₹ 540

(4) ₹ 720.

स्पष्टीकरण:

               विक्री=540

               नफा=90

खरेदी किंमत= विक्री - नफा

                 =540-90

                 =450

म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे

5] गौरीने चौदा हजार पाचशे रुपयांस घेतलेल्या टी.व्ही.ला साडेतीनशे रुपये दुरुस्तीसाठी खर्च केले, नंतर तो टी.व्ही. सोळा हजार रुपयांना विकून टाकला, तर तिला या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला ? 

(1) ₹ 1,050 नफा 

(2) ₹1,050 तोटा 

(3) ₹1,150 नफा 

(4) ₹1,150 तोटा.

स्पष्टीकरण

T .V खरेदी किंमत=₹14500

    इतर खर्च=₹350

T .V खरेदी किंमत=14500+350

                        =14850

टीव्ही ची विक्री किंमत=16000


विक्री किंमत जास्त आहे येथे नफा होईल

नफा=विक्री किंमत- खरेदी किंमत

      =₹16000-₹14850

      =₹1150

म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे



    

         .