सरळ व्याज

https://haridasrathod05.blogspot.com/2024/02/blog-post_14.html
             सरळ व्याज

महत्वाचे मुद्दे
(1) बँक ठेवीदारांना बँकेत रक्कम ठेवल्याबद्दल जो मोबदला देते, त्याला व्याज असे म्हणतात.

(2) ठेवीदाराने / खातेधारकाने बँकेत ठेवलेल्या किंवा बँकेकडून कर्ज घेतलेल्या रकमेला मुद्दल असे म्हणतात. 

(3)   मुद्दल वापरलेल्या कालावधीला मुदत (काळ) असे म्हणतात. 

(4) प्रत्येक 100 मुद्दलासाठी 1 एकक कालावधी (मुदती) साठी मोबदला आकारण्याचा जो दर असतो, त्याला व्याजाचा दर असे म्हणतात. 

द.सा.द.शे. = दर साल दर शेकडा 

(5) एका विशिष्ट मुद्दलावरील ठरावीक मुदतीचे व्याज व ते मुद्दल मिळून होणाऱ्या रकमेस रास असे म्हणतात. 
रास = मुद्दल + व्याज.

(6) सरळव्याजाचे सूत्र : 
स =सरळव्याज
म= मुद्दल
क= मुदत, काळ
द =दर
सरळ व्याज =- मुद्दल × दर × मुदत ÷100

1) स = म × द x क ÷ 100

2) म =स×100÷द× क

3) द =स × 100 ÷म x क

4) क = स × 100÷ म x द

(7) 'दामदुप्पट होणे' म्हणजे मुद्दलाइतके व्याज होणे. दामदुप्पट झाली असता रास मुद्दलाच्या दुप्पट होते.
 Online test सोडवा 👇