वर्ग 5 वा. विषय. बुद्धिमत्ता चाचणी [शिष्यवृत्ती परीक्षा] घटक: वर्गीकरण [शब्दसंग्रह,संख्या,आकृती]

वर्ग 5 वा. विषय. बुद्धिमत्ता चाचणी [शिष्यवृत्ती परीक्षा] घटक: वर्गीकरण [शब्दसंग्रह,संख्या,आकृती]
वर्ग 5 वा. विषय. बुद्धिमत्ता चाचणी [शिष्यवृत्ती परीक्षा] घटक: वर्गीकरण [शब्दसंग्रह,संख्या,आकृती]

              

वर्गीकरण संकल्पना

वर्ग 5 वा.

विषय. बुद्धिमत्ता चाचणी [शिष्यवृत्ती परीक्षा]

घटक: वर्गीकरण [शब्दसंग्रह,संख्या,आकृती]

भारांश 10%


 वर्गीकरण म्हणजे उपलब्ध विभागनी नुसार शब्दाला वेगळे करणे होय .'वर्गीकरण' म्हणजे वेगवेगळे करणे, अवतीभवती असलेल्या विविध वस्तू आणि घटना यांचा अनुभव आपण सतत हीत असतो. यांतील काही वस्तूंमध्ये (किंवा घटनांमध्ये) आपल्याला कोणत्यातरी बाबतीत साम्य आढळते. त्यानुसार आपण त्यांचे गट बनवतो.


'वर्गीकरण' या घटकामध्ये 

(1) शब्दसंग्रह 

(2) आकृत्या व 

(3) संख्या 

             हे उपघटक समाविष्ट केलेले आहेत. उपघटकानुसार प्रत्येक प्रश्नात चार पर्याय दिलेले असतात. यांतील तीन पर्यायांमध्ये काही बाबतीत साम्य असते व एक पर्याय वेगळा असतो.

विद्यार्थ्याने हा वेगळा पर्याय ओळखणे अपेक्षित असते.


वर्गीकरण-1 : शब्दसंग्रह

उपघटकातील प्रश्नांमध्ये चार शब्द दिलेले असतात. शब्दांच्या अनुषंगाने त्यांचे स्वभाव, गुण लक्षात घेतल्यास यांतील तीन शब्दांमध्ये साम्य दिसून येते व त्यांचा एक गट बनतो. चौथा शब्द या गटातील शब्दांपेक्षा हवेगळा गुण दर्शवतो. विदयार्थ्यांनी आपल्या सामान्य ज्ञानाचा उपयोग करून गटात न बसणारा शब्द शोधायचा असतो.

             अवांतर वाचनही करावे लागते.


वर्गीकरण-2 : संख्या

उपघटकातील प्रश्नांमध्ये चार संख्या दिलेल्या असतात. यांतील तीन संख्यांमध्ये सम-वि

मूळसंख्या - संयुक्त संख्या, विशिष्ट संख्येने भाग जाणाऱ्या संख्या वगैरे गुणांवर आधारित साम्य दिसून

त्यामुळे या तीन संख्यांचा गट बनतो.


1)रोमन अंक, अपूर्णांक, त्रिकोणी व चौरस संख्या, घड्याळ, सम-विषम, मूळ-जुळ्या, मूळ-सहमूळ संख्या विचारात घ्यावेत.


(2) 1 ते 30 संख्यांचे पाढे लक्षात ठेवावेत.


(3) 1 ते 20 संख्यांचे वर्ग लक्षात ठेवावेत.


(4) 1 ते 10 संख्यांचे घन लक्षात ठेवावेत.



(5) दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज, अंकांमधील फरक, गुणाकार / भागाकार, सम-विषम संख्या


(6)अपूर्णांकाच्या बाबतीत अंश व छेद यांच्यातील तुलना यांचा विचार करून हे प्रश्न सोडवता येतात.


वर्गीकरण-3 : आकृत्या

उपघटकातील प्रश्नांमध्ये चार आकृत्या दिलेल्या असतात. यांतील तीन आकृत्यांमध्ये काही साम्य आढळते. हे साम्य ओळखून विदयार्थ्यांनी त्या आकृत्यांचा एक गट बनवावा आणि एक आकृती वेगळी करावी.

आकृत्यांमधील साम्य शोधताना विद्यार्थ्यांनी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात


(1) आकृत्यांची रचना/ आकार,


(2) आकृत्यांचा आतील भाग..


(3) आकृत्यांमधील रेषा/बिंदू/चिन्हे यांची संख्या, स्थान व दिशा,


(4) आकृत्यांचे आरशातील/ पाण्यातील प्रतिबिंब,


(5) आकृत्या घटिवत/प्रतिघटिवत फिरवून दिसणारी स्थिती..


या घटकावर आधारीत एक चाचणी खाली दिलेली आहे विद्यार्थ्यांनी ती सोडवावे.